Undertaking
(फॉर्म - बी)
हमीपत्र
(रुपये १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅम्पपेपरवर नोटराईज्ड केलेले)
आम्ही- श्री. व श्री. या सोसायटी / ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव अनुक्रमे -या संस्थेचे प्राचार्य, संचालक -तसेच - खालीलप्रमाणे हमीपत्र लिहून देतो की,
१. संस्थेमध्ये सुरु असलेल्या सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांची माहिती संस्थेच्या- ---या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द माहितीनुसार बरोबर असून त्यात कोणतीही तफावत नाही.
२. संस्थेमध्ये तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी प्रसिध्द केलेल्या संस्थेच्या माहितीपुस्तिकेत खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
अ) संस्थेमध्ये मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता.
ब) प्रत्येक अभ्यासक्रमासाठी परिषदेच्या निकषाप्रमाणे मंजूर, भरलेली व रिक्त पदांची माहिती
पदधारकांची नावे, त्यांची शैक्षणिक अर्हता आणि अभ्यासक्रमनिहाय शुल्क इत्यादी. क) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संस्थांमध्ये तक्रारनिवारण अधिकारी यांची नियुक्ती केली असून त्याबाबतची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली
असून- ---या लिंकवर उपलब्ध आहे. ड) अँटी रॅगींग व अँटी कॅपीटेशन फी अॅक्टच्या तरतूदी संस्थेस बंधनकारक असून त्याबाबतची माहिती संस्थेच्या माहितीपुस्तीकेत व संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली असून---
-- या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच अँटी रॅगिंग संदर्भात प्रवेशित विद्यार्थी व पालकांकडून विहीत नमुन्यातील रुपये १००/- च्या स्टॅम्पपेपरवर हमीपत्र घेण्यात आलेले आहे.
इ) मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार (विशाखा जजमेंट) शैक्षणिक संस्थांमध्ये होणा-या विद्यार्थीनींच्या छेडछाडीवर प्रतिबंध करण्याकरीता संस्थांमध्ये महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून त्याबाबतची माहिती संस्थेच्या माहितीपुस्तिकेत व संकेतस्थळावर उपलब्ध करुन
- या लिंकवर उपलब्ध आहे. फ) संस्थेत दिव्यांगांसाठी रॅम्प व त्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे.
देण्यात आलेली असून-
ग) अग्नि प्रतिबंधक कायद्यानुसार संस्थेत आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आलेली आहे.
ह) संस्थेत सिगारेट/तंबाखू आणि इतर अंमली पदार्थांच्या सेवनापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्याकरीता जागृती व तद्अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. ज) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद / वास्तुविद्या परिषद व कौन्सिल ऑफ फार्मसी यांच्या विहित मानका
व प्रमाणका नुसार संस्थेमध्ये आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. वरील माहिती आमच्या माहितीनुसार बरोबर असून त्यात कोणतीही तफावत नाही. भविष्यात माहितीमध्ये तफावत किंवा खोटी असल्याचे आंढळल्यास त्यास सर्वस्वी आम्ही जबाबदार राहू.
2024 08 16 11:49